ठळक मुद्देखेळाडू परतले स्वगृही उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमान १२ आॅक्टोबरपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचा १५ आॅक्टोबरला समारोप झाला.
या स्पर्धेत राज्यभरातील ५४ संघातील ५०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. दरम्यान, समारोपीय कार्यक्रमात त्यातील यशस्वी खेळाडूंना विविध स्वरूपातील मेडल्स व इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आले.