शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती प्रक्रियेस प्रारंभ!

By admin | Updated: August 22, 2016 23:58 IST

चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांची ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अमोल कल्याणकर मालेगाव(जि. वाशिम),दि. २२: शासनाकडून दरवर्षी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृतीच्या माध्यमातून शिक्षण घेण्याकरिता अर्थसहाय्य केले जाते. त्यानुषंगाने यावर्षी २0१६-१७ या चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांची 'ऑनलाइन' पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील पहिली ते दहावीमध्ये शिकणार्‍या मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू या समाज घटकातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजनेचा लाभ दिला जातो. सदर विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी बँक खात्यावर १ हजार रुपए जमा केले जातात. तसेच केंद्रप्रमुख यांनी केंद्रांतर्गत २0१५-१६ मधील पात्र विद्यार्थ्यांंंचे ह्यरिनेवलह्ण करून घेण्याच्या सूचना आहेत. जास्तीत जास्त फ्रेश अर्ज ऑनलाईन भरावे लागणार आहेत. दरम्यान, २0१५-२0१६ या शैक्षणिक वर्षांंंत पात्र विद्यार्थ्यांंंच्या याद्या शाळांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय शिष्यवृत्तीचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज सादर करता येणे शक्य नसल्याने त्यामधे अडथळा येत आहे. ही बाब लक्षात घेवून याद्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.पात्रतेचे निकषएकही विद्यार्थी अल्पसंख्याक मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. शिष्यवृत्तीकरिता शासनाने पात्र ता निकष ठरविले आहेत. यात गतवर्षी विद्यार्थ्याने ५0 टक्के गुण प्राप्त केलेले असावे. पालकाचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड बंधनकारक आहे.