शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधितांचे अन्नत्याग आंदाेलनास प्रारंभ; बेलाेरा येथील मंदिरात आंदाेलन

By नंदकिशोर नारे | Updated: July 26, 2023 14:07 IST

या आंदाेलनामध्ये गावकऱ्यांचा माेठया प्रमाणात सहभाग असून महिलाही यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत

वाशिम :  अतिवृष्टी आणि खोराडी नदीच्या महापुराचे पाणी मानाेरा तालुक्यातील बेलोरा व विठोली गावात शिरल्याने घरातील अन्न धान्य, कापूस, सोयाबीन व शेतीसाठी आणलेले खत पाण्यात भिजून विस्कळीत जनजीवनाला पूर्वपदावर आणण्यासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत व बेलोरा येथे पूर संरक्षण भिंतीची बांधणी करावी, या मागणीसाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड व गावकऱ्यांच्यावतीने २६ जुलै पासून गावातील कृपागीर महाराज मंदिरात  अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

या आंदाेलनामध्ये गावकऱ्यांचा माेठया प्रमाणात सहभाग असून महिलाही यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत. पन्नास घरांची लोकवस्ती असणाऱ्या बेलोरा गावालगत वाहणारी खोराडी नदी असून या नदीमुळे गावकऱ्यांना महापुराचा अनेक वेळा फटका बसलेला आहे. महापुराच्या संरक्षणासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे संरक्षण भिंतीची मागणी केली; परंतु आमच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. याकरिता त्वरित खोराडी नदीच्या तीरावर संरक्षण भिंत निर्माण करून प्रति घराला २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी जोपर्यंत शासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत  अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदाेलनकर्ते यांनी घेतला आहे.  आंदाेलनात परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनाेहर राठाेड यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. या आंदाेलनाकडे मानाेरा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.