शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या तूर खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:41 IST

वाशिम : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासनामार्फत टोकन वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार केंद्रांचा समावेश : टोकनाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासनामार्फत टोकन वाटप करण्यात आलेल्या शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव व कारंजा येथील बाजार समित्यांमधील केंद्रांवर तूर खरेदीस बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज वाशिम येथील खरेदी केंद्रांना भेट देऊन तुरीच्या खरेदी प्रक्रियेची माहिती घेतली व तूर खरेदीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी शेतकºयांची तूर शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्याची योजना ३१ मे पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या कालावधीत तूर खरेदी पूर्ण न झाल्याने शासनाने शेतकºयांकडे असलेल्या पेरेपत्रकानुसार उपलब्ध असलेल्या तूर शेतमालाची नोंद करून टोकन वाटप केले होते. तसेच १० जून २०१७ पर्यंत तूर खरेदी सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही टोकन वाटप केलेल्या शेतकºयांची तूर शिल्लक राहिल्याने शासनाने टोकन वाटप करण्यात आलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यास २१ व २६ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे.ज्या शेतकºयांनी तूर शेतमालाची नोंदणी करून टोकन प्राप्त केले असेल, त्यांच्याकडे असलेल्या तूर साठ्याची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्राम सचिव यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत तूर साठ्याची पाहणी करण्यात येणार आहे. टोकनधारक शेतकºयांनी स्वत:चीच तूर विक्रीसाठी आणावी. शेतकºयांच्या टोकनवर व्यापाºयांची तूर विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.