शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.ची मालवाहू ट्रकला धडक; सहा प्रवासी जखमी!

By admin | Updated: January 28, 2017 20:05 IST

राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस व मालवाहू ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. २८ -  राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने मालवाहू ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवार, २८ जानेवारी रोजी कारंजा तालुक्यातील वालई फाट्यानजिक सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
बुलडाणा आगाराची एम एच ४०-५८६ क्रमांकाची बस शनिवारी यवतमाळ येथून दारव्हा, कारंजा, अकोलामार्गे बुलडाणाकडे जात होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील वालई फाट्यानजीक या बसने मालवाहू ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बसमधील मोहळ येथील वच्छलाबाई महादेव कदोळे (वय ६० वर्षे), रूपाली रमेश गडुळे (वय १५ वर्षे), वढवी येथील गुलाब अवताळे (वय ६२ वर्षे) यांच्यासह कारंजा येथील किशोर यंदे, नंदा यंदे व शशी यंदे हे सहा प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मनसे व समृध्दीच्या रूग्णवाहिकांनी जखमी प्रवाशांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचारासासाठी आणले. त्यातील तीन प्रवाशांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालक मो. इरफान लाल मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी एसटी बसचालकाविरूद्ध भादंवि २७९, ३३६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश रंदे करित आहेत.