शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:58 IST

वाशिम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर येथे श्री श्री रविशंकर यांची शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून १ ते ४ आॅक्टोंबरदरम्यान श्री हनुमान रामकथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ आॅक्टोंबर रोजी स्थानिक मध्यमेश्वर मंदिर येथून नगर परिषद मार्गे शुक्रवापेठ, माहुरवेश पर्यत १०८ कलशधारी महिलांची कलशयात्रा काढण्यात ...

ठळक मुद्देभाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : ४ आॅक्टोबपर्यंत विविध कार्यक्रम

वाशिम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर येथे श्री श्री रविशंकर यांची शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून १ ते ४ आॅक्टोंबरदरम्यान श्री हनुमान रामकथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ आॅक्टोंबर रोजी स्थानिक मध्यमेश्वर मंदिर येथून नगर परिषद मार्गे शुक्रवापेठ, माहुरवेश पर्यत १०८ कलशधारी महिलांची कलशयात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला व पुरूषांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

सर्वप्रथम मध्यमेश्वर मंदिर येथे देवी वैभवश्रीजींनी पुजाअर्चना केली. तदनंतर संस्थानच्या वतीने रंगनाथ पांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून माताजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हरिष बाहेती, डॉ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रविण बाहेती,  राम बाहेती, गुड्डु बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती, आर्ट आॅफ लिव्हींगचे विजय चव्हाण, अग्रवाल, अर्चना मेहकरकर, निलेश सोमाणी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. रस्त्यात ठिकठिकाणी भाविक भक्तांनी रांगोळी काढून माताजींचे स्वागत केले. यावेळी मुखेड येथील मित्रसंघ यांचा ४० लोकांचा ढोलपथक आकर्षणाचा केंद्र ठरला. सामाजिक कार्यकर्ते अनिल जाजु यांच्या पुढाकाराने या पथकाचे नगरीत आगमन झाले. या पथकातील प्रमुख असलेला अवघ्या ५ वर्षीय बालक कृष्णा जाजु याने सुध्दा ढोल वाजविले. सदर कथा १ आॅक्टोंबरपासून माहुरवेश ज्ञानगंगा परिसरात सुरु झाली असून  २ आॅक्टोंबर रोजी श्रीराम व श्री हनुमान जन्म, ३ आॅक्टोंबर रोजी केवट, शबरी व श्री हनुमान भेट, ४ आॅक्टोंबर रोजी श्रीराम राज्यभिषेक याप्रसंगाचे गुणगाण व कथा होणार आहे. ३ आॅक्टोंबरला दुपारी १२  ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रोकडीया हनुमान प्रभातफेरी मंडळ शेलू यांच्या सानिध्यात संगीतमय १०८ श्री हनुमान चालिसापाठचे आयोजन करण्यात आलेले आहे. ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी १ ते ४ महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजेपासून सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी  मोठया संख्येने लाभ घ्यावा व कलशयात्रेत महिलांनी कलश घेवून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.