शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:27 IST

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. यात समृद्ध गाव स्पर्धेत ...

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. यात समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमेदच्या महिलांनीही यात नोंदणी केली. दर शुक्रवार व रविवारी सकाळी ११ वाजता पाणी फाऊंडेशनच्या यूट्युब पेजवर ऑनलाईन शेतीशाळा घेण्यात येते. त्यामध्ये या सर्व महिला व शेतकरी सहभागी होतात. या शेतीशाळेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनने आजवर सोयाबीन या विषयावर आधारित सात प्रकारचे व्हिडिओ तयार केले आहेत. ज्यामध्ये पिकाची ओळख, पूर्वमशागत, बियाणे निवड, कीड नियंत्रणाची पूर्वतयारी, नोंदवही, बीज प्रक्रिया व पेरणी या व्हिडिओंचा समावेश आहे. हे सर्व व्हिडिओ पाणी फाऊंडेशनच्या यूट्यूब पेजसह फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे पाणी फाऊंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता आमिर खान यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार या ऑनलाईन शेती शाळेत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी उपस्थित असतात व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. पाणी फाऊंडेशनने तयार केलेला पेरणीचा व्हिडिओ खूप लोकांनी आवर्जून पाहिला आहे. यामध्ये पारंपरिक तसेच बीबीएफ पेरणी यंत्राच्या पेरणीतील फरक, त्याचे फायदे-तोटे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. यामुळे यावर्षी बीबीएफ यंत्राने पेरणी करण्यावर शेतकरी भर देत आहेत.

-----------

जिल्ह्यात ५६५१ शेतकऱ्यांची नोंदणी

डिजिटल आॅनलाइन शेती शाळेसाठी जिल्ह्यातील ५६५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कारंजा लाड तालुक्यातील ३७०४ व मंगरूपीर तालुक्यातील १९४७ शेतकºयांचा समावेश असून, संपूर्ण राज्यातून ४६ हजार शेतकºयांनी या आॅनलाइन शेती शाळेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकºयांचे पाणी फाऊंडेशनने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केलेले असून, या ग्रुपवर शेतकरी प्रश्न विचारू शकतात, आपल्या समस्या मांडू शकतात, तसेच त्यांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही या ग्रुपवर शेतकºयांना दिले जाते. तसेच शेतकºयाकडून आलेल्या प्रश्नावर लाईव्ह कार्यक्रमांत चर्चाही केली जाते.