श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे साकारत असलेले राष्ट्रमंदिर हे संपूर्ण देशवासीयांचे ऐक्याचे प्रतीक आहे. श्रीराम मंदिर हे फक्त धार्मिकच नसून ते सामाजिक समतेचे प्रतीकसुद्धा आहे . याप्रसंगी जनजागृती युवा संमेलनास दुर्गावाहिनीच्या प्रांत संयोजिका रोहिणी सरुडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. विश्व हिंदू परिषदेचे चंद्रकांत घोराडे, सतीश हिवरकर, आशिष कोठारी आदिंनी युवकांना राष्ट्रभक्तीबाबत मार्गदर्शन केले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप घुगे व विक्रम वावरे यांनी राम जन्मभूमीचा इतिहास मांडल .मातृशक्तीच्या अश्विनी सुजदेकर, रूपाली बाहेती यांनी राम-सीताचरित्र प्रत्येक युवक-युवतींनी आपल्या जीवनात आचारणात आणले पाहिजे हे पटवून दिले. रामजन्मभूमीच्या संघर्षासाठी वाशिम शहरातील मोठ्या संख्येने रामभक्ताचे योगदान होते. त्यामधील काही कारसेवकांचा कार्यक्रमाप्रसंगी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिमच्या मातृशक्ती, राष्ट्रीय सेवा समिती, विश्व मांगल्यच्या महिला सदस्यांनी प्रयत्न केले.