शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By admin | Updated: October 13, 2016 01:50 IST

समतेचा संदेश देत जिल्हाभरातून रॅली काढण्यात आल्यात.

वाशिम, दि. १२- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाशिम शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. समता व शांततेच्या रॅलीद्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली इतिहास केला. या घटनेला ६0 वर्षे पूर्ण झाल्याने जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायी, विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांच्या वतीने धम्ममय वातावरणात हा सोहळा साजरा केला. स्थानिक नालंदा बुद्ध विहारात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी सामुहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना घेण्यात आली. त्यानंतर भव्य स्वरुपात मिरवणूक काढण्यात आली. सिव्हिल लाईन मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीची सांगता करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून महिला व पुरूष मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा शहरातील धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, रिसोड तालुक्यातील चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याजवळ सकाळी सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी शांतता रॅली काढण्यात आली. भीम गीत, धम्म प्रश्न मंजूषा यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.