शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अपंग कायद्यानुसार तीन टक्के निधी खर्च करा!

By admin | Updated: July 12, 2017 19:32 IST

मंगरुळपीर नगराध्यक्षांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : शासनाच्या २०१३ व २०१५ च्या शासन निर्णयानुसार अपंगाची जन्म मृत्यु नोंद निर्णयाप्रमाणे मंगरुळपीर नगर पालीका क्षेत्रात अपंगाची नोंद करावी अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने नगराध्यक्ष डॉ. गजाला यास्मीन मारुफ खान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर निवेदन देवून करण्यात आली. यावेळी ऍड. मारुफ खान, लेखापाल शशिकांत इंगोले, गणेशपुरे यांची उपस्थिती होती.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासन निर्णयानुसार अपंग प्रमाणपत्र सादर करणार्‍या अपंगांची नोंदणी करण्यासाठी नोदंणी रजिस्टरमध्ये नोंद घेण्याबाबत शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु मंगरुळपीर नगर पालिका क्षेत्रात या परिपत्रकाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. तरी उपरोक्त शासन निर्णयानुसार सदर परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करुन अपंग बांधवांना न्याय द्यावा. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार अपंग कल्याण कार्यासाठी तसेच वैयक्तिक लाभांच्या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी ३ टक्के लाभार्थी अपंग असण्याबाबत अपंग कल्याण कृती आराखडा २००१ राबविण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. परंतु मंगरुळपीरमध्ये या शासन निर्णयाची पुरेपुर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. या शासन निर्णयानुसार अपंगांना शासनाच्या सर्व योजनांमध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतांना महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व छावाचे विदर्भ संपर्क प्रमुख मनिष डांगे, विदर्भ उपाध्यक्ष केशव कांबळे, महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष केशव कांबळे, विदर्भ सहसचिव गोपाल मोटे, राज्य संचालिका वंदना अक्कर, महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष यमुनाबाई बेलखेडे, तालुका अध्यक्ष विठ्ठल गादेकर, तालुका संपर्कप्रमुख दिलीप इंगोले, तालुका कार्याध्यक्ष काझी नजरुद्दीन काजी कजरुद्दीन, सहसचिव मनोज इंगळे, कोषाध्यक्ष संजय अंबलकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुजाता लबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.