शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:10 IST

शिरपूर जैन : येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने २९ जुलै रोजी हर्षोल्लासात श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचा निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमिरवणुकीत समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभागधार्मिक कार्यक्रमांची रेलचेलगावातून निघाली मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने २९ जुलै रोजी हर्षोल्लासात श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचा निर्वाण महोत्सव साजरा करण्यात आला.महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता गावातून श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माताजी, भैयाजी, दीदी व इंद्र, इंद्रायणी, श्रावक, श्राविका सहभागी झाले होते. ही मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने पोलीस स्टेशनसमोरून श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान, पवळी मंदिरात पोहचली. तेथे पूजा-अर्चा झाल्यानंतर परत दिगंबर जैन बस्ती मंदिरमध्ये आली. तेथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ विधान मंडळासाठी संगीतमय पूजन करण्याकरिता श्री पार्श्वनाथ भगवान हे २३ वे तीर्थंकर असल्यामुळे इंद्र, इंद्रायणींच्या जोड्या पूजेला बसविण्यात आल्या होत्या. पार्श्वनाथ विधानमध्ये इंद्र बनण्याचा मान लातूर येथील विजयकुमार कस्तुरे यांनी प्राप्त केला. भगवंताला शांतीधारा करण्याचा मान ऋषिकेश राजेंद्र ढोले; तर भगवंत पार्श्वनाथ यांना प्रथम निर्वाण लाडू चढविण्याचा मान रत्नाकर रोकडे यांनी मिळविला. आर्यिका सन्मती माताजी यावेळी बोलताना म्हणाल्या, की जे हातचे गेले, त्याचा विचार करण्यापेक्षा भविष्याचा विचार करायला हवा. वेळ कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे वेळेवर कार्य केले पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यात काय अर्थ ? जसे दिवा विझल्यानंतर तेल निरर्थक आहे, पीक सुकल्यावर पाणी निरर्थक आहे, अपघात झाल्यावर ब्रेक मारणे निरर्थक आहे, त्याचप्रमाणे वेळ निघून गेल्यानंतर कर्म करणेही निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील सर्व श्रावक, श्राविका व परगावहून आलेल्या श्रावकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज व महिला मंडळ, युवा मंच, शिरपूर जैन यांनी केले.