शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:51 IST

शेलूबाजार : जून महिनाच्या प्रारंभलाच मान्सूनचा आगमन झाल्यामुळे शेतीच्या कामाला गती मिळाली असून, शेतकरी यांनी बी-बियाणे खरेदीबरोबर शेतीची कामे ...

शेलूबाजार : जून महिनाच्या प्रारंभलाच मान्सूनचा आगमन झाल्यामुळे शेतीच्या कामाला गती मिळाली असून, शेतकरी यांनी बी-बियाणे खरेदीबरोबर शेतीची कामे जोमात सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी परिसरात ६५ ते ७० टक्के सोयाबीनचा पेरा होता, मात्र यंदा ९० टक्के सोयाबीन पेरा वाढणार असून, कोरोना काळात सोयाबीनला मिळालेल्या दरामुळे हा पेरा वाढणार असल्याचे शेतकऱ्यांत बाेलल्या जात आहे. १० टक्क्यांमध्ये तूर, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे.

जून महिन्यापासूनच पाऊस बरसत असल्याने शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळच्या सुमारास शेतातील विविध कामे करण्यावर शेतकरी भर देत आहेत. शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले. परिस्थितीवर मात करत शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात पिकाची पेरणी करण्यासाठी तेवढ्याच उमेदीने तयारी करीत आहेत. कोरोना महामारीमुळे शेतजमिनी वगळता इतरत्र कामे नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकरी मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गतवर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनपूर्व शेतातील कामे लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस झाल्यास बरेच शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कृषी केंद्रात खते, बियाणे, कीटकनाशके आदी खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची कृषी केंद्रावर गर्दी कायम आहे. आज रोजी बी-बियाणे तसेच शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खते बियाणे उपलब्ध आहेत.