शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका!

By admin | Updated: October 2, 2016 02:29 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हतबल; सोंगलेल्या सोयाबीनला फुटताहेत ‘कोंब’.

वाशिम, दि. 0१- सलग तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवरील अस्मानी-सुलतानी संकटांची शृंखला यावर्षीही कायम आहे. मध्यंतरीचा प्रदीर्घ उघाड आणि ऐन सोंगणी हंगामात २९ आणि ३0 सप्टेंबरला झालेल्या परतीच्या पावसाने खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनला जबर फटका बसला आहे. सोबतच कपाशी आणि उडीद ही पिकेही धोक्याच्या सावटात सापडली आहेत.२0१३-१५ या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वदूर दमदार पाऊस झाला; मात्र त्याचा शेतकर्‍यांना फायदा होण्याऐवजी अधिकांश प्रमाणात नुकसानच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून चांगली सुरुवात करणार्‍या पावसाने मध्यंतरी दीर्घ दडी मारल्यामुळे सोयाबीनसोबतच खरिपातील इतर पिकेही करपायला लागली होती; तर अनेक ठिकाणचे सोयाबीन पिवळे पडले होते. अशाही स्थितीत तग धरून असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आर्थिक चणचण भासत असतानाही पैशांची जुळवाजुळव करून सोयाबीनच्या सोंगणीचे काम हाती घेतले. सुमारे २५ टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या सुड्या शेतशिवारांमध्ये रचून ठेवल्या; मात्र २९ व ३0 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे सोंगलेले सोयाबीन बहुतांशी भिजले असून त्यास ह्यकोंबह्ण फुटत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यासह उडीद आणि कपाशी या पिकांनाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. वातावरणातील असमतोलामुळे कपाशी या पिकावर ह्यमरह्ण रोगाचा प्रादुर्भाव झाला असून ऐन काढणीच्या मोसमात उडीद पिकाला अधिक पावसामुळे नुकसान संभवत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.