शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या झाडांवरच उगवताहेत सोयाबीनची रोपे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती ...

दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली नैसर्गिक संकटे कायमच आहेत. त्यामुळे एखादेतरी पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हाती येते की नाही अशी शंकाच निर्माण झाली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, किडींचा प्रादुर्भाव या सर्व आपत्तींनी शेतकऱ्यांना यंदाही बेजार केले आहे. मूग, उडीद, कपाशी सर्वच पिकांना या आपत्तींचा फटका बसला. त्यात सप्टेंबरच्या मध्यंतरापर्यंत नैसर्गिक आपत्तींचा सामना करून सावरलेले सोयाबीन पीक आता परतीच्या पावसाने पिच्छा पुरविल्याने संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकूर फुटून झाडावरच सोयाबीनची रोपे दिसू लागली आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकावर हा प्रकार होत असल्याने शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडला आहे.

०००००००००००००००००००

कापणीची अन् वाळविण्याचीही संधी नाही

बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा सुकण्याच्या स्थितीत असल्याने शेतकरी पिकाची कापणी करण्याच्या तयारीत होते; परंतु गेल्या चार, पाच दिवसांपासून पाऊस उसंतच घेत नसल्याने हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीची अन् वाळविण्याचीही संधीही मिळू शकली नाही.

००००००००००००००००

गुरांच्या चाऱ्यासाठीही उपयोग नाही

सततच्या पावसामुळे अनेक भागातील साेयाबीन पिकाची स्थिती एवढी वाईट झाली आहे की, या पिकाची कापणी करून त्यापासून थोडेथोडके पैसे मिळण्याची शक्यता दूरच, गुरांना चारा म्हणूनही हे पीक उपयोगी पडण्याची शक्यता उरली नाही.

०००००००००००००००००००००

शेतकरी म्हणतात, मायबाप शासन मदत देईल का ?

१) कोट : गेल्या चार, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचा सत्यानाश केला. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नच गंभीर झाला. उत्पन्नाची कोणती आस नाही. आता मायबाप शासन या नुकसानापोटी मदत देईल का?

- प्रीतम भगत,

शेतकरी,

०००००००००००००००

२) कोट : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक होत्याचे नव्हतेच केले. या पिकावर संपूर्ण खर्चाची आणि कुटुुंबांची मदार होती. आता उत्पन्नाची कोणती आशा नाही. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.

- डिगांबर उपाध्ये,

शेतकरी,

००००००००००००००००००

शासनाकडे अहवाल पाठवू

कोट: सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे नियमानुसार होतील, तसेच या पिकाच्या शेंगांना फुटलेल्या अंकुराची स्थिती पाहता, सहकाऱ्यांना पाहणीच्या सूचना देऊन शासनाकडे अहवाल पाठवून मदतीचा विचार करण्याचीही मागणी करू.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशिम