शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे भाव गडगडले!

By admin | Updated: October 29, 2014 23:50 IST

हमीभावाने मोडले शेतक-यांचे कंबरडे; हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिर.

अकोला : सतत दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावातही यावर्षी वाढ झाली नसून, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी बियाण्यांसाठीही शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. कसेबसे मिळालेले बियाणे मोठय़ा प्रमाणात वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. किटकनाशकांच्या फवारणींचा अतिरिक्त खर्चही वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. किमान उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल २५00 ते २९00 रूपयांपेक्षा जास्त सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परपिक्वतेपूर्वीच वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगाची वाढ खुंटली. त्याच आधारावर व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांच्या सोयाबीनची लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षाच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्यासारखी शेतकर्‍यांची परिस्थितीच नाही. त्यामुळे शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी जात असून, त्याचे परिणाम पुढील वर्षीही जाणवणार आहेत. हमीभावाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिरावले आहे. त्याचाही फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.