शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:52 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा पिकलेल्या सोयाबीनची आवक बाजारात वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु अपुºया पावसामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट येत आली असतानाच हमीभावापेक्षा खूप कमी दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. 

ठळक मुद्देकाढणीला वेगउत्पादनात घट, दरही कमी असल्याने शेतकरी निराश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा पिकलेल्या सोयाबीनची आवक बाजारात वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु अपुºया पावसामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट येत आली असतानाच हमीभावापेक्षा खूप कमी दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात  यंदा पावणे दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तथापि, विपरित हवामान आणि अपुºया पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली असून, एकरी दोन क्विंटलही सोयाबीनचे उत्पादन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. आता सणउत्सवाच्या काळात आपल्या गरजा भागविण्यासह रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी बाजारात येत असल्याने या शेतमालाची आवक वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची मंगळवारी सहा हजार क्विंटल आवक झाली होती. त्याशिवाय, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड येथेही यंदाच्या सोयाबीनची मोठी आवक होत असल्याचे बाजार समित्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे; परंतु या पिकाचे उत्पादन घटल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना बाजारात या शेतमालास अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळत आहे. शासनाने यंदा सोयबीनसाठी ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले असताना बाजारांत केवळ २५ ते २८ रुपये प्रति क्विंटल दराने शेतकºयांना भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला आहे.