शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST

वाशिम : जिल्ह्यात जवळपास ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मागील २-३ वर्षांपासून सोयाबीन पिकाची उत्पादकता विविध ...

वाशिम : जिल्ह्यात जवळपास ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मागील २-३ वर्षांपासून सोयाबीन पिकाची उत्पादकता विविध कारणामुळे कमी होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे तांत्रिक बाबीची माहिती होऊन उत्पादन सोबतच उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे सोयाबीन पीक सुधारीत लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाईन माध्यमातून ४ जून २०२१ रोजी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय तज्ज्ञ कृषिविद्या टी. एस देशमुख हे लाभले.

मार्गदर्शक सत्रात टी. एस देशमुख यांनी सुधारित सोयाबीन लागवड तंत्र याबद्दल मार्गदर्शन करताना सोयाबीन पीक अद्यावत संशोधनाची स्थिती व दिशा, लागवडीच्या विविध वाणाची वैशिष्ट्ये गुणधर्म, उत्पादकता व कीडरोग प्रतिकारकता या संदर्भात विशेष माहिती तसेच पीक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी बियाण्याची निवड, उगवणशक्ती तपासणे, रासायनिक खते वापर, पूर्व मशागत, तण व्यवस्थापन, पीक संरक्षण इत्यादी महत्त्वाच्या बाबी याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध शाखांकडून प्रसारित अद्यावत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढ तसेच पीक उत्पादनाच्या समस्यांवर मात करून शेतीतील उत्पन्न दुप्पट करावे असे आवाहन केले. सोयाबीन पिकामध्ये सर्व लागवडीपासून तर काढणीपर्यंत तांत्रिक बाबीचा अवलंब करावा अशी विनंती केली.

कार्यक्रमात सहभागी प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन सुधारित वाण वापर अनुभव कथन केला. त्यानंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रम सहाय्यक संगणक तज्ज्ञ एस. आर बावस्‍कर यांनी केले.