शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन शेंगांतून निघताहेत ‘कोंब’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:38 IST

मेडशी : खरीप हंगामातील सोयाबीनच्या हिरव्या झाडांवरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकारासंदर्भात कृषी सहाय्यकदेखील अनभिज्ञ आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त कृषी सहाय्यक अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : खरीप हंगामातील सोयाबीनच्या हिरव्या झाडांवरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकारासंदर्भात कृषी सहाय्यकदेखील अनभिज्ञ आहेत.यंदा मेडशी परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. खरीप हंगामात  मेडशी परिसरात शेतकºयांनी उडीद, मुंग, सोयाबीन, ज्वारी, तूर आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पावसाने दडी मारल्याने उडीद, मूग पिकाच्या एकरी उत्पादनात घट आली आहे. काहींचा तर पेरणीचा खर्च सुध्दा निघालेला नाही. अशा स्थितीत आता सोयाबीनच्या शेंगांतूनही ‘कोंब’ बाहेर येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. एकामागून एक येणाºया संकटांचा सामना करताना शेतकºयांची दमछाक होत आहे. मूग, उडदाच्या एकरी उत्पादनात प्रचंड प्रमाणातील घट, हमीभावाने नसलेली मूग व उडदाची खरेदी आणि आता सोयाबीनच्या शेंगातून बाहेर निघणारे ‘कोंब’ आदीमुळे शेतकºयांची झोप उडाली आहे. मेडशी येथील बद्रोधीन गवरे, उत्तमराव देशमुख या शेतकºयांसह परिसरातील अनेक शेतकºयांच्या  शेतात ३० ते ४० टक्के सोयाबीन झाडावरील शेंगामधून ‘कोंब’ बाहेर आल्याचे दिसून येते. याबाबत कृषी विभागातील  कृषी सहाय्यक ढवळे यांना माहिती दिली तसेच हा प्रकार निदर्शनात आणून दिला असता, त्यांनीसुध्दा हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले. हा नेमका काय प्रकार आहे, यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना दिली जाईल तसेच सोयाबीन शेंगाचे काही नमुने तपासणीसाठी कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांना माहिती दिली जाईल, असे ढवळे यांनी सांगितले. शेंगामधून कोंब बाहेर येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.