शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जावई व प्रियकराने मिळून केली महिलेची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:35 IST

वाशिम :  परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील राईबाई त्र्यंबक घुगे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये कैलास प्रल्हाद गंगावणे (जावई) व सुभाष तागड (मृतक महिलेचा प्रियकर) हे दोन आरोपी निष्पन्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 

ठळक मुद्देराईबाई हिचा गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह सोनाळा धरणामध्ये पायाला दगड बांधुन फेकुन दिलानऊ महिन्यानंतर गुन्हा उघडकीस दोन्ही आरोपी देपूळचे 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील राईबाई त्र्यंबक घुगे या महिलेची डिसेंबर २०१६ मध्ये हत्या झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये कैलास प्रल्हाद गंगावणे (जावई) व सुभाष तागड (मृतक महिलेचा प्रियकर) हे दोन आरोपी निष्पन्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. राईबाई त्र्यंबक घुगे (रा. गव्हा ता.जि. परभणी) ही महिला २८ डिसेंबर २०१६ रोजी देपूळ (ता.जि. वाशिम) येथे आपल्या जावयाच्या घरी आली होती. मुलगी व जावई यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे नवरा-बायको यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी राईबाई परभणी येथून आल्या होत्या. राईबाई घुगे हिचे देपूळ येथे जावयाकडे येणे जाणे असल्यामुळे सुभाष तागड याचेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यामुळे दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. राईबाई घुगे हिने कालांतराणे प्रियकर सुभाष तागड याला ब्लॅकमेलींग करून पैशाची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास आपले संबंध समाजात उजागर करेन अशी धमकीही दिली. यासह राईबाई घुगे हीच्याकडून जावई कैलास गंगावणे याला सुध्दा त्रास होता. आपल्या जावयाविरूध्द घुगे हिने तिच्या मुलीला पोलीसात तक्रारी देण्यास भाग पाडले होते. राईबाई घुगे हिच्या त्रासाला कंटाळून कैलास गंगावणे व सुभाष तागड यांनी संगनमत करून घुगे हिला कायमचे संपविण्याचा कट रचला. अखेर २८ डिसेंबर २०१६ रोजी जावई कैलास व प्रियकर सुभाष या दोघांनी राईबाई घुगे हिला आपल्याला एका महाराजांना भेटायला जायचे आहे. असे सांगुन किन्हीराजा जवळ असलेल्या सोनाळा धरणाजवळील वाघामाय मंदिरावर घेऊन गेले. त्याठिकाणी राईबाई हिचा गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह सोनाळा धरणामध्ये पायाला दगड बांधुन फेकुन दिला. या घटनेचा तपास जऊळका पोलीसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रकाश डुकरे यांनी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास पथक नेमले. या तपास पथकाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोपींचा छडा लावला. यामध्ये मृतक महिलेचा जावई कैलास गंगावणे व प्रियकर सुभाष तागड (दोघेही रा. देपुळ ता.जि. वाशिम) यांचा समावेश आहे. पोलीस पथकाने या दोन्ही आरोपीकडून मृतक महिलेच्या अंगावरील चोरलेले ७६ हजार रूपये किंमतीचे दागिने व एक मोटरसायकल जप्त केली. तपास पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण साळवे, अजय वाढवे, कैलास इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता.