शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांनी उचलला कोेरोनाबाधितांवरील उपचाराचा खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

गजानन गंगावणे देपूळ (वाशिम) : ‘गाव करी ते राव न करी’ याची प्रचिती वाशिम तालुक्यातील शेलु बु. येथे येत ...

गजानन गंगावणे

देपूळ (वाशिम) : ‘गाव करी ते राव न करी’ याची प्रचिती वाशिम तालुक्यातील शेलु बु. येथे येत आहे. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे या उद्देशातून शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एवढेच नव्हे तर आवश्यक ती औषधेदेखील उपलब्ध करून दिली आहे.

सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे. ही परिस्थिती पाहून गावातील रुग्णांवर पहिल्याच टप्प्यातच योग्य उपचार मिळावे यासाठी शेलु. बु. येथील सर्व सैनिक एकवटले असून, त्यांनी उपचार व औषधीचा खर्चही उचलला आहे. लवकर निदान व उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, हे यापूर्वी अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी गावातच आरोग्य उपकेंद्रात सुविधा उपलब्ध केली आहे. गावातील आठ सैनिक, इतर अधिकारी, सरपंच यांनी समन्वयातून कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांनादेखील गावातच मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खासगी डॉक्टरची सेवा घेण्यात येत आहे. दिमतीला आरोग्य कर्मचारीदेखील आहेत. सैनिक असलेले देवानंद गुट्टे, भागवत दमगीर, पंडित तडसे, अनिल उमाळे, राजू तडसे, विठ्ठल ठाकरे, अजय गावंडे, करण कदम, गजानन ठाकरे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, सरपंच तूषणा देवानंद गुट्टे आदींनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना मानसिक व आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न चालविला आहे. गावातील डॉ. श्याम रेखडे यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांवर देखरेख ठेवून आहेत. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधांचा खर्चही सैनिकांनी उचलला आहे. गावात औषधांचा साठादेखील उपलब्ध करून दिला आहे.

०००

कोट बॉक्स

कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ आहे, या उद्देशाने प्रेरित होऊन शेलू बु. येथील सैनिकांनी व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून गावातील रुग्णांना गावातच मोफत उपचाराची सुविधा करून देण्याचे कार्य करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो. देशाची सेवा करीत असताना जन्मभूमीचे ऋण फेडण्याची संधी मिळाली.

-देवानंद गुट्टे, सैनिक शेलुू बु.