शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर पंपाची ‘ऊर्जा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:17 IST

वाशिम : ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही तसेच खंडित पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यातील  १00 खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार असून, आतापर्यंंत ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसौर पंप जोडणीसाठी ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त १00 ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही तसेच खंडित पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यातील  १00 खंडित पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार असून, आतापर्यंंत ९३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांची प्रतीक्षा आहे.ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही किंवा ज्या ग्रामपंचायती सार्वजनिक लघुजल व नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज देयके अदा करू शकत नाहीत किंवा वीज देयक न भरल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे, अशा सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जा पंपाचा वापर केल्यास सदर योजना बंद पडणार नाहीत व ग्रामपंचायतींचा वीज देयकांचा भार कमी होईल, या उद्देशाने सौर ऊर्जा पंप योजना अमलात आणली आहे. वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे जवळपास १00 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जा पंपाचा आधार मिळणार आहे. यासाठी या ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.वीज पुरवठा होऊ न शकणार्‍या वस्त्या, वाड्या, गावे, ग्रामपंचायती या ठिकाणी पाण्याचा उपसा व पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकरिता सौर पंपाचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेंतर्गत वस्त्या, वाड्या, गावे व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सौर ऊर्जेवर आधारित ३, ५, ७.५ व १00 अश्‍वशक्ती क्षमतेचे प्रतिविभाग १00 नग पारेषण विरहित सौर पंप आस्थापित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. आतापर्यंंत ९३  ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अजून २00 च्या आसपास प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ज्या गावांचे किंवा ठिकाणाचे पाणी प्रदूषित आहे, येथे योजनेसोबत आवश्यकतेनुसार जलशुद्धीकरण संयंत्रासाठी आवश्यक असणार्‍या विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी स्वतंत्रपणे ‘सोलर मोड्युल’ आस्थापित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या निधीची तरतूद ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेला स्वतंत्रपणे करावी लागणार आहे. 

या ग्रामपंचायतींनी सादर केले प्रस्तावमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वाशिम अंतर्गत नऊ प्रादेशिक पाणीपुरवठय़ांसाठी सौर ऊर्जा पंपाकरिता प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील वडगाव इजारा, उंबर्डाबाजार, सुकळी, कामठवाडा, कार्ली, लोहगाव, काजळेश्‍वर, धोत्रा जहागीर, डोंगरगाव, गायवळ, धानोरा ताथोड, आखतवाडा, शिवण बु., पारवा, पिंप्री मोडक, राहाटी, माळेगाव, पिंप्री वरघट, मोरगव्हाण, झोडगा, सोहळ, जांब, हिंगणवाडी, लाडेगाव, रामनगर अशा २६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील पारवा, आसेगाव, पोटी या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले. मालेगाव तालुक्यातील कवरदरी, चिवरा, वसारी, वरदरी बु., मारसूळ, झोडगा बु., कोळगाव बु., भोरद, काळाकामठा, किन्ही घोडमोड, हनवतेखडा, वारंगी, सिरसाळा, गिव्हा कुटे, इराळा या १५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. रिसोड तालुक्यातील वडजी, केशवनगर, दापुरी बु. या तीन ग्रामपंचायतींचे तर मानोरा तालुक्यातील चौसाळा, मोहगव्हाण, चोंढी, कोलार, जनुना खु., जामदरा घोटी, म्हसणी, बोरव्हा, उमरी बु., सोमनाथनगर, गव्हा, अजनी, विळेगाव, खांबाळा, भिलडोंगर, सोमठाणा, कुपटा या १७ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले. बुधवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील आणखी २0 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याने हा आकडा ९३ वर पोहोचला आहे.

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर पंपाचा वापर सुलभरीत्या व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतींनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.- गणेश पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.