शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषीपंपाबाबत शेतकरी उदासिन!

By admin | Updated: March 5, 2017 02:13 IST

वाशिम जिल्ह्यात १३00 पैकी केवळ १६९ पंप सुरु

वाशिम, दि. ४- शेतीला अखंडीत वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौरकृषीपंप योजनेत जिल्ह्याला १३00 पंप मंजूर आहेत. यासाठी ५ एकराखालील शेतकर्‍यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते. मात्र, उर्वरित पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याबाबत शेतकरी उदासिन आहेत. परिणामी, १३00 चे उद्दीष्ट असताना आजमितीस केवळ १६९ सौर कृषीपंप कार्यान्वित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.शाश्‍वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊज्रेसाठी सौर कृषीपंप योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अपारंपारिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्‍वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेवून राज्यशासनाने शेतकर्‍यांना सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत संपूर्ण राज्यात ७ हजार ५४0 सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५0 ए.सी. आणि ५५0 डी.सी., असे एकंदरित १ हजार ३00 पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांना ३.५ किंवा ७.५ अश्‍व क्षमतेचे सौर कृषीपंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून तब्बल ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणार्‍या शेतकर्‍यांना ८५ टक्के अनुदान दिले जाते. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या वतीने यासंबंधी प्रभावी जनजागृती करण्यात आली. त्यास प्रतिसादही मिळाला. त्यानुसार, ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत या योजनेअंतर्गत १२५४ शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले. त्यापैकी ६७१ प्रस्तावांना महावितरणकडून मान्यता देण्यात आली. मात्र, ६७१ पैकी केवळ २७४ लाभार्थीनींच त्यांना देय असलेला लाभार्थी हिस्सा भरला असून इतर ३९७ लाभार्थींनी यासंदर्भात उदासिनता दर्शविली आहे. त्यातही प्रत्यक्षात केवळ १६९ कृषीपंपच आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.सौर कृषीपंपाची योजना जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी सर्वार्थाने फायदेशीर आहे. शेतीला अखंडित तथा हक्काची वीज मिळण्यासोबतच वीज देयकांच्या खर्चातूनही शेतकर्‍यांना मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. असे असताना शेतकर्‍यांमधून या योजनेला प्रतिसाद मिळत नाही. - दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम