बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लाऊन त्याचे संगोपन करावे, असा संकल्प बौद्ध बांधवांनी केला होता. हे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन व्हावे, या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षलागवडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सि.दा. भगत, हरिश्चंद्र पोफळे, गोविंदराव इंगळे, संध्या पंडित, प्रा. हरिदास बनसोड, देवानंद वाकोडे, पंढरी खिल्लारे, डॉ. गांजरे, छगन सरकटे, पी.पी. सरकटे, बळीराम पट्टेबहादूर, अभिमान पंडित, हर्षल इंगोले, प्रा. शालिग्राम पठाडे, प्रमोद बेलखेडे, शालिग्राम चुंबळे, भीमराव चव्हाण, नागोराव उचित, प्रा.मुकुंद वानखडे, दिलीप गवई, सतीश भगत, समन ताजने, शुद्धोमती सुर्वे, मंदा गवई, मंदा वाघमारे आदींनी केले आहे.
वृक्षलागवडीसाठी सरसावले समाजसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST