शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जालना, परभणी जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST

वाशिम : मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीनजूक वसलेला वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून ...

वाशिम : मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीनजूक वसलेला वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे. ही रेती वाशिममध्ये आणली जात असून अनेक रेती तस्कर या ठिकाणी सक्रिय झाले आहेत. असे असताना महसूल विभागाचे कर्मचारी रेती तस्करांसोबत अर्थपूर्ण व्यवहारांमधून ‘मॅनेज’ झाल्याने कुणावरही कारवाई होत नसल्याचे उघड होत आहे.

पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने वाशिम जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा गेल्या ५ वर्षांपासून लिलाव झालेला नाही. असे असतानाही बांधकामांसाठी लागणारी रेती ठरावीक पैसे मोजल्यास सहज उपलब्ध होत आहे. यासंबंधी अधिक माहिती घेतली असता, मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या नदीवरून आणि मंठा (जि.जालना) येथील नदीघाटावरून हिंगोली जिल्ह्यातील कापडशिंगी, सेनगाव, गोरेगाव, कोळंबी यामार्गे वाशिम शहरातील हिंगोली रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळून चोरीची रेती अवैधरीत्या वाशिममध्ये आणली जात आहे.

सद्यस्थितीत वझरजवळून वाहणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने तेथून होणारी रेतीची वाहतूक बंद आहे; मात्र मंठा येथून हिंगोली-जालना या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बन या गावात स्टॉप घेऊन तेथून हिंगोली व वाशिम या दोन जिल्ह्यांना रेती सप्लाय केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत महसूल विभागाला पुरेशी कल्पना आहे; परंतु अर्थपूर्ण सेटलमेंटमुळे कुणावरही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

......................

कोट :

चोरट्या मार्गाने होत असलेल्या रेती वाहतुकीसंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल. तहसीलदारांशी समन्वय साधून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला जाईल. याउपरही हा गंभीर प्रकार थांबला नाही; तर संबंधितांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला जाईल.

- प्रशांत जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम