वाशिम : सद्या उन्हाळयाचे दिवस सुरु झाल्याने पाणी टंचाईची झळ पाहिजे त्या प्रमाणात पोहचलेली दिसून येत नसली तरी काही भागातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ दिसून येत आहे.वाशिम शहरात सद्यस्थितीत नगरपरिषदेच्यावतिने व्यवस्थित पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्यात पाण्याच्या पातळी कमी झाल्यानंतर दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागणार आहे. अल्लाडा प्लाट, दत्त नगर भागात असलेल्या काही झोपडपटीतील नागरिकांन आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने अर्धा किलोमिटर रस्तयावर असलेल्या रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय परिसरात असलेलय विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. या भागात सार्वजनिक नळ आहेत परंतु ते केव्हा येतात केव्हा येत नसल्याने नागरिकांना पाण्याची आवश्यकता भासल्यास या विहिरीवरुन नागरिक पाणी घेवून जातांना दिसून येत आहेत. सद्या गर्दी असली तरी कोणतेही वाद निर्माण होत नाहीत. मे महिन्यात येथे मोठया प्रमाणात गर्दी राहत असल्याने पाणी भरणाऱ्यांच्या रांगा येथे लागलेल्या दिसून येतात. गतवर्षी पाऊस जास्त झाल्याने यावर्षी पाणी टंचाईची झळ पोहचणार नाही असे वाटत असले तरी अनेक भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.
झोपडपट्टीतील नागरिकांना शाळेच्या विहिरीचा आधार!
By admin | Updated: April 15, 2017 13:47 IST