मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. ३- शहरालगत असलेल्या गाव शिवारातील तलावात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शहरातील वार्ड क्रमांक ९ मधील हाफीजपुरा येथील रहिवासी शेख अफसर खॉ वाहेद खॉ हे म्हैशीला काढण्यासाठी तलावात गेले असता, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मंगरुळपीर येथे पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू
By admin | Updated: August 4, 2016 02:00 IST