सद्यस्थितीत जे उमेदवार जिल्ह्यातील रुग्णालयात काम करीत आहेत, त्यांना प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता प्रशिक्षण प्रतिमान (आरपीएल)द्वारे, तसेच जे उमेदवार आरोग्य क्षेत्रात नव्याने काम करण्यास इच्छुक आहेत, अशा उमेदवारांना नवीन उमेदवार (फ्रेशर) म्हणून कमीतकमी ३ महिने ते जास्तीतजास्त ६ महिने कालावधीचे विविध कोर्सेसमधील प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उमेदवारांनी प्राथमिक माहिती व कोणत्या कोर्समध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता याबाबतची माहिती ‘गुगल फॉर्म’मध्ये ऑनलाइन पद्धतीने भरून सादर करावी. या गुगल फॉर्मची लिंक मिळविण्यासाठी ‘सेंड मी गुगल फॉर्म लिंक’ असा मेसेज पाठवावा.
उमेदवारांनी भरलेली माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राकडून व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय)कडे पुरविण्यात येईल. त्यानुसार, संबंधित संस्था आपणास पुढील प्रशिक्षणासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून कळविणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील रोजगार, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन बजाज यांनी केले आहे.