शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पोळा सणाचा पोलिस बंदोबस्त सहा गावांनी नाकारला

By admin | Updated: August 25, 2014 01:55 IST

रिसोड पोलिस स्टेशन क्षेत्रातील ६५ गावांपैकी सहा गावांनी पोळा या सणासाठी पोलिस बंदोबस्त नाकारला

वाशिम जिल्ह्यातील प्रकार विवेकानंद ठाकरे / वाशिममहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत रिसोड पोलिस स्टेशन क्षेत्रातील ६५ गावांपैकी सहा गावांनी पोळा या सणासाठी पोलिस बंदोबस्त नाकारला, तर १३ गावांनी बंदोबस्तासाठी पोलिसांची मागणी केली आहे.शेतकर्‍यांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या पोळय़ाला गावामध्ये शांतता नांदावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने संवेदनशील गावामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येते. राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २00७ पासून सुरू झाली. या धर्तीवर तंटामुक्ती अध्यक्ष पोलिस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये शांततामय वातावरण निर्माण करून पोलिस बंदोबस्त नाकारण्यासाठी पुढाकार घेतला जातो; परंतु अद्यापही तंटामुक्त गाव मोहिमेला पूर्णत: यश प्राप्त झाले नाही. केवळ आसेगाव पेन, वरुडतोफा, कोयाळी, करंजी गरड, व्याड, बाळखेड या ६ गावांतील नागरिकांनी पोलिस बंदोबस्त नाकारण्याचे पत्र पोलिस स्टेशनला सादर केले आहे. पोलिस बंदोबस्तासाठी करडा, देऊळगाव बंडा, बिबखेडा, खडकीसदार, घोटा, पळसखेडा, वाडी वाकद, कवठा, मोरगाव, कंकरवाडी, लेहणी या गावांनी मागणी केली. बहुतांश १५ लहान गावांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत नाही. यामध्ये गणेशपूर, नांदळवाडी, पेडगाव, गौढाळा, किनखेडा, कन्हेरी, मांगवाडी, नागझरी, उकीरखेड आदींचा समावेश आहे.