कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
वाशिम : कृषी विज्ञान केंद्र वाशिम अंतर्गत संत्रावर्गीय पिकावरील ‘कीड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर आडोळी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
महावितरणच्या जीवनप्रकाश योजनेला प्रतिसाद
वाशिम : राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीज जोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद लाभत आहे.
खरडलेल्या शेतीसाठी मदतीची मागणी
वाशिम : गत महिन्यात अतिवृष्टीमुळे उमरा शमशोद्दीन येथील जमिनी खरडून गेल्या, तर एका शेतकऱ्याची विहीरही खचली. या नुकसानीस महिना उलटला तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात तहसीलदार वाशिम यांच्याकडे निवेदनही दिले आहे.
स्वच्छतेबाबत ग्रामस्थांत जनजागृती
वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती हेाती.
समृद्ध गाव स्पर्धा, फळझाड लागवड
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायत तपोवन येथे ६ हजार संत्रा रोपाची लागवड करण्यात आली. गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत गावात विविध कामे केली जात आहेत. शिवाय वृक्ष लागवड आणि भूजल सर्वेक्षणही होत आहे.
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम : जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत वाशिम-पुसद मार्गावर २१ वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. चार दिवसांत ७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शहरातील विविध रस्त्यांवर करण्यत आली.