रिसोड (वाशिम): मुलीच्या विवाह सोहळय़ासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह सहा लाखांचा माल लंपास केल्याची घटना ८ डिसेंबरच्या उत्तररात्रीच्या दरम्यान गुरुवार बाजारस्थित घरामध्ये घडली आहे. फिर्यादी शिवचंद्र बगडिया मुलीच्या लग्नासाठी अमरावती गेले असता घरातील दरवाजे तोडून ४ लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व १ लाख ३0 हजार रुपये नगदी असा ६ लाख ९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. कपाटामधील ६0 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या किंमत १ लाख ५0 हजार, सात सोन्याच्या अंगठय़ा ४0 ग्रॅम किंमत १ लाख रुपये, २ नगर सोन्याच्या कानातील रिंग २0 ग्रॅम किंमत ५0 हजार, २0 ग्रॅम सोन्याची पोत किंमत ५0 हजार, सोन्याचे छोटे-मोठे दागिने २0 ग्रॅम किंमत ५ हजार २५ हजार, २५ हजार किमतीचे ८00 ग्रॅम चांदीचे शिक्के व चांदीचे ताट, ग्लास, चमचे असे १५00 ग्रॅम वजन असलेले भांडे किंमत ५४ हजार असा एकूण ६ लाख ९ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. घटनेचा तपास लावण्याच्या दृष्टीने श्वानपथक बोलाविण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला.
रिसोड येथे सहा लाखांची चोरी
By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST