शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

मार्चपासून ज्येष्ठांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:17 IST

देशात २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात कोरोनाने कहर केला. वाशिम जिल्ह्यातही सप्टेंबर ...

देशात २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यापर्यंत देशात कोरोनाने कहर केला. वाशिम जिल्ह्यातही सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढला होता. दरम्यान, कोरोना विषाणू प्रतिबंधक लस आल्याने देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना प्रतिबंधक लस (कोविशिल्ड) देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (शहरी व ग्रामीण) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून ५० वर्षांवरील ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस मिळण्याचे संकेत असून, त्याआनुषंगाने आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व अतिजोखीम गटातील नागरिक किती आहेत, लस उपलब्धता याआनुषंगाने माहितीचे संकलन केले जात आहेत. अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने आणि सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मार्च महिन्यापासून ज्येष्ठ व अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याचा अंदाज आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे.

०००

बॉक्स

पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावरून डोस प्राप्त होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ व अतिजोखीम गटातील नागरिकांना मार्च महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा शुभारंभ झाला, तर लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

०००

कोट बॉक्स

पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून ज्येष्ठ नागरिक व अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन असून, त्याआनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित असून, मोबाइलवर संदेश प्राप्त होताच संबंधितांनी लस घ्यावी.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

०००००