शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी

By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST

जागेचा लोचा कायम: निवासस्थानही नाही

अनसिंग : पाच वर्षापूर्वी अनसिंगला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरति करण्यात आले. मात्र, पाच वर्षातही स्वतंत्र जागाच उपलब्ध झाली नसल्याने सद्यस्थितीत ग्रा.पं.च्या दोन खोलीत या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रामध्ये ३९ गाव अंतभरूत असून या एकूण गावातील लोकसंख्या ६७,७२४ आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये डॉ. एस.डी. सुडे व डॉ. खान हे या ठिकाणी कार्यरत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारत नसल्यामुळे आवश्यक त्या उपकरणांचा फायदा रुग्णांना देता येत नाही. या ठिकाणी इमारत नसल्यामुळे कर्मचार्‍यांना निवासाची व्यवस्था नाही. या आरोग्य केंद्रामध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. तरीसुद्धा वाशिम, तोंडगाव, पार्डी, अनसिंग, आसेगाव या ठिकाणी जाउन कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्या जाते. समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यायला जिल्हा प्रशासनाजवळ वेळ नसल्याने रोष व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेची पाहणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही तयार आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून गेले. मात्र, त्यानंतर कुठे माशी शिंकली, हे सर्वसामान्य रुग्णांना माहित नाही. या जागेचा गुंता अजूनही (दि.१३) सुटला नसल्याने सुविधा नसलेल्या दोन इमारतीत रुग्णांवर उपचार केले जातात. डॉक्टर व कर्मचार्‍यांना राहण्यासाठी निवासस्थानाची सुविधादेखील नाही.