शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिका-यांसह २५ कर्मचा-यांना ‘कारणे दाखवा’

By admin | Updated: November 28, 2015 02:58 IST

नगर परिषद कर्मचारी दांडी प्रकरण.

वाशिम : कामाच्या वेळेत गैरहजर असणार्‍या नगर परिषदेच्या दोन अधिकारी व २३ कर्मचार्‍यांना सहायक कार्यालय निरीक्षक यांनी २६ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसेस बजावल्यात. यामध्ये बांधकाम विभागाचे इंजिनिअर विनय देशमुख, सहायक समाज कल्याण अधिकारी सुरेश राठोड यांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांना नगर परिषदेमध्ये विविध कामे करताना अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्ष लता उलेमाले यांना दांडीमार कर्मचार्‍यांची चौकशी करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना सुटीच्या दिवशीच (गुरु नानक जयंती ) २५ नोव्हेंबर रोजी केल्या होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबरला बांधकाम विभागाचे इंजिनिअर विनय देशमुख, सहायक समाज कल्याण अधिकारी सुरेश राठोड, संगणक विभागाचे ए.बी. भगत यांच्यासह २३ चतुर्थ ङ्म्रेणी अनुपस्थित कर्मचार्‍यांना कारणो दाखवा नोटिसेस बजावण्यात आल्याची माहिती सहायक कार्यालय निरीक्षक बी.डी. देशमुख यांनी दिली. नगर परिषदेमधील विविध विभागातील अधिकारी बाहेर दौर्‍यावर किंवा काही कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगून भिंतीवर लावलेल्या अधिकार्‍यांच्या नंबरवर संपर्क करण्याचे उपस्थित शिपायाकडून सांगण्यात येते. अधिकार्‍यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, मात्र तो लागत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अनेक चकरा नगर परिषदेमध्ये माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.