रिसोड (जि. वाशिम) : शहरातील मटन मार्केटस्थित दोन दुकानास आग लागल्याची घटना घटना ७ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ वाजतादरम्यान घडली. या घटनेत ६0 ते ७0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच घर, दुकान, गोठय़ांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंंत रिसोड तालुक्यातील आगीच्या पाच घटना घडल्या आहेत. ७ एप्रिल रोजी रिसोड नगर परिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मटन मार्केटलगतच्या टीनपत्राच्या दोन दुकानास अचानक आग लागल्याचे लक्षात आले. आग विझवेपर्यंंत दुकानांमधील असलेले साहित्य जळून खाक झाले होते. सदर दुकाने हे शेख ख्वाजा शे. फरीद व मेहराज खान यांची होती. या दुकानामध्ये मांस ठेवण्याचे कॅरेट व फर्निचर, लाकडी दरवाजे आदी साहित्य होते. आग विझविण्यासाठी न.प.ची अग्निशामक दलाची गाडी बोलविण्यात आली होती. सदर घटनेची पो.स्टे.ला तक्रार नसल्यामुळे पंचनामा करण्यात आला नाही.
दुकानास आग; हजारोचे नुकसान
By admin | Updated: April 8, 2015 01:57 IST