शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कॅरीबॅग्ज वापरणा-या दुकानदारांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:25 IST

वाशिम शहरात १० नोव्हेंबरपासून प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. अचानक राबविण्यास सुरुवात केलेल्या या मोहीमेमुळे प्लास्टिक पिशव्या वापरणा-या दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली . सदर मोहीम राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी दुकानात जावून प्लास्टिक पिशव्या ठिकाणांची झाडझडती घेवून त्या जप्त करण्यात आल्यात.

ठळक मुद्देदुकानदारांची धावपळ प्लास्टिक कॅरीबँग्ज जप्ती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  प्लास्टिक पिशव्या (कॅरिबॅग्ज) वापरामुळे पर्यावरणावर होणारा  परिणाम लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १० नोव्हेंबरपासून प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. अचानक राबविण्यास सुरुवात केलेल्या या मोहीमेमुळे प्लास्टिक पिशव्या वापरणा-या दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली . सदर मोहीम राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी दुकानात जावून प्लास्टिक पिशव्या ठिकाणांची झाडझडती घेवून त्या जप्त करण्यात आल्यात. प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीव, मनुष्यावर परिणाम करतो. शहरामध्ये याचा वाढता वापर बघता ४० माईक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाइ्रची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ही मोहीम राबवून सर्व दुकानदारांना कल्पना देण्यात आली होती. ही मोहीम आता केव्हाही सुरु करुन प्लास्टिक कॅरीबॅग्ज वापरणºया दुकानदांरावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा दुकानदारांना देण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणार्थ कोणीही प्लास्टिक बॅग्ज न वापरण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.आठवडी बाजाराच्या दिवशी मोठया प्रमाणात लघु व्यावसायिक दुकाने थाटतात . दर रविवारी विशेष मोहीमेसह दररोज गावातील दुकानदार, लघुव्यावसायिकांच्या जवळ जावून त्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो काय याची शहनिशा करणे व आढळल्यास त्याला ताकीद ेदण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करणार आहेत. आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व जनावरांसाठी प्लास्टिक पिशव्या घातक असल्याने त्याचा वापर टाळावा असे आवाहनही नगरपरिषद आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. या मोहीमेत स्वच्छता पर्यवेक्षक राजेश महाले, जितु बढेल, नागपूरकर, साईनाथ सुरोशे यांच्यासह नगरपरिषद कर्मचाºयांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे.  (प्रतिनिधी)

वाशिम नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यसात येत असलेल्या प्लास्टिक निर्मूलन मोहीमेला व्यापाºयांनी सहकार्य करावे तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करावे.                   - गणेश शेटे, नगरपरिषद, मुख्याधिकारी वाशिम