शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : बुरशी तयार झाल्याने 'आरटीपीसीआरचे' नमुने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST

धनंजय कपाले वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे ...

धनंजय कपाले

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने उघड्यावरच जास्त दिवस पडून राहिले. परिणामी त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार १ मार्च रोजी उघडकीस आला. परिणामी वाशिम येथील प्रयोगशाळेने बुरशी आलेले ११० नमुने परत केल्यामुळे मालेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने उघडकीस आला आहे.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे शोधून काढण्यासाठी 'आरटीपीसीआर' चाचणी केली जाते. ही चाचणी करण्यासाठी संदिग्ध रुग्णाच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जातो. स्रावाचे नमुने घेण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन आणि जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २४ फेब्रुवारीपासून घेतलेले नमुने आणि मालेगावमधील स्रावाचे असे एकूण ३१० नमुने घेऊन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संतोष घुले हे १ मार्च राजी वाशिम येथील कोविड प्रयोगशाळेमध्ये सायंकाळी ५ वाजता घेऊन आले. या ३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले. उर्वरित ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने लॅबच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन घुले यांना परत केले. परत केलेले नमुने घुले यांनी मालेगावच्या तालुका अधिकारी कार्यालयामध्ये रीतसर पाठवून दिले. ज्या ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली ते नमुने चार दिवसाआधीचे होते असे सांगण्यात येत आहे.

००००००

नियम काय म्हणतो ?

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने हे दोन ते आठ सेंटीग्रेट तापमानात ठेवावे लागतात. हे नमुने त्याच दिवशी सायंकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रयोगशाळेमध्ये पोहचते करणे आवश्यक आहे. परंतु या सर्व नियमांची ऐशीतैशी करून आरोग्य अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

०००००

त्या ११० लोकांचे नमुने परत घ्यावे लागणार

जऊळका आणि शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या ज्या ११० लोकांचे नमुने बुरशीमुळे परत करण्यात आले. त्या ११० लोकांना परत बोलावून त्यांचे नमुने घेण्याची मोठी जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.

००००

दोषींवर कोणती कार्यवाही होणार?

११० स्त्राव नमुन्यांमध्ये तयार झालेली बुरशी ही ज्यांच्या चुकीमुळे झाली त्यांचेवर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याची जबाबदारी ज्यांचेवर दिलेली आहे, त्याच वैद्यकीय अधिकाºयांचा निष्काळजीपणा या घटनेमधुन अधोरेखीत झाला. साधे मास्क लावले नसेल तर एकीकडे शिक्षा होते. हा प्रकार तर मास्क पेक्षाही गंभीर स्वरूपाचा निश्चितच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या घटनेतील दोषींवर कोणती कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

००

घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर असून याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल. यानंतर अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले जाईल.

डाॅ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम