रिसोड, दि. ३१- वीज प्रश्न तातडीने निकाली काढा; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा पदाधिकार्यांनी सोमवारी घेतला. खासदार भावना गवळी यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालय परिसरात महावितरणच्या अधिकार्यांनी शिवसैनिक व शेतकर्यांशी संवाद साधला.शेतकर्यांचा रब्बी हंगाम लक्षात घेता वीजपुरवठय़ाच्या मागण्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक होत महावितरणच्या अधिकार्यांना यावेळी धारेवर धरले. जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून द्यावे, कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी, मंजूर झालेल्या नवीन रोहित्राचे काम तातडीने पूर्ण करावे, लोडशेडींगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करू नये, कृषीपंपांना लागणारा विजेचा दाब कमी-जास्त प्रमाणात ठेवू नये आदी मागण्या शिवसेनेच्यावतीने यापूर्वीच महावितरणच्या अधिकार्यांकडे केल्या होत्या. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिला होता. याची दखल घेत महावितरणच्या अधिकार्यांनी सोमवारी शिवसैनिक व शेतकर्यांशी चर्चा केली.महावितरणचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी चर्चा करताना उपरोक्त मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही यावेळी दिली. मेश्राम यांच्या लेखी आश्वासनामुळे १ नोव्हेंबरचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचे आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दिलेल्या आश्वासनानुसार विजेची कामे झाली नाहीत तर शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महादेवराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, अँड. गजानन अवताडे, उपतालुका प्रमुख शिवाजीराव खानझोडे, शिवाजीराव अवताडे, राजेंद्र बोडखे, रंगराव खडसे, मदन ढोले, पंजाबराव शिंदे, जगन्नाथ बिल्लारी, प्रकाश चोपडे, गजानन सानप, सतीश धोटे, मधुकरराव साबळे, बळीराम चोपडे, इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. वीजपुरवठय़ाची समस्या कायम राहिली तर आंदोलनाचा इशारा दिला.
वीज प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक!
By admin | Updated: November 1, 2016 00:00 IST