गोभणी येथे शिवजयंतीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करून व तसेच सर्व महापुरुषांच्या विचारांना वंदन करून करण्यात आली. त्यानंतर कोरोना काळात गावात सेवा देणाऱ्या गावातील आरोग्य विभागातील कर्मचारी व सेवा देणारे सर्व डॉक्टर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना शेवटी सन्मानपत्र देऊन शिबिराचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शंभुराजे मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नवयुवक मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम सामाजिक अंतर राखून पार पाडण्यात आला.
गोभणी येथे शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:58 IST