शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही

By admin | Updated: June 13, 2017 01:18 IST

खासदार सावंत : पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ता सभा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारुन केलेल्या शिवसैनिकांच्या कार्याला यश आले आहे. सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. तसेच कर्जमाफी झाकी है, स्वामिनाथन आयोग अभी बाकी है, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा खा.अरविंद सावंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.ते शहरातील शिवसेना भवन येथे १२ जून रोजी पार पडलेल्या पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ता, सभेत बोलत होते. यावेळी खा.सावंत, खा.भावना गवळी, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार, शहर प्रमुख राजू देशमुख, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख राजू ठाकरे, डॉ.श्याम जाधव, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड, सागर मांडन, विशाल राठोड, देवानंद हळदे, विनोद तुळजापुरे, नंदु पाटील, सुनील जाधव, मनोहर राठोड, अजय देशमुख, नरहरी कडू आदींसह इतरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाषणात रवि पवार यांनी कर्जमुक्त होणारच, या अभियानासाठी संपूर्ण परिसर पिंजुन काढला. एकूण १५ हजार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी अर्ज भरुन घेतले. यासह तालुक्याच्या आढावाबाबत सांगितले. सावंत यांनी म्हटले की, यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात कर्जमुक्ती झाली, तेव्हासुद्धा शिवसेनेने कर्जमाफी देता की जाता अभियान राबविले होते. तेव्हासुद्धा आघाडी सरकारला शिवसेनेने कर्जमुक्ती देण्यास भाग पाडले होते. आजसुद्धा शिवसेना सत्तेत असताना श्ेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीकरिता अग्रेसर राहून कर्जमाफीची घोषणा पदरात पाडून घेतली. सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, तसेच तत्काळ शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देणे, तसेच बोगस बियाणे रोखण्यासाठी शिवसैनिकांनी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पवार, सूत्रसंचालन प्रा.विकास चौधरी, आभार डॉ.श्याम जाधव यांनी मानले.