शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसेना हाच माझा श्वास आहे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:40 IST

वाशिम : बालपणापासून आपल्या रक्तात शिवसेना असून, शिवसेना हाच माझा श्वास आहे, शिवसेना आपण कधीही सोडणार नाही, त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी सोमवारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले

ठळक मुद्देखासदार भावना गवळीपत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालपणापासून आपल्या रक्तात शिवसेना असून, शिवसेना हाच माझा श्वास आहे, शिवसेना आपण कधीही सोडणार नाही, त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी सोमवारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलेस्थानिक सिव्हिल लाइन स्थित शासकीय विश्रामगृह येथे खासदार गवळी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, शिवसेना पक्षात आपण सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्ष प्रमुखांनी नेहमी आपल्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. जनतेनेसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी विजयी केले आहे. आपले राजकीय भवितव्य संपुष्टात आणण्यासाठी कदाचित आपल्या विरुद्ध भाजपात जाण्याच्या वावड्या उठवत असतील तरी यापासून आपण किंचितही विचलीत होणार नसून, शिवसेना पक्ष कदापि सोडणार नाही. शिवसेनेने कायम पद, प्रतिष्ठा दिली आहे. आपण पक्षात राहताना शिवसेनेच्या तळागळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचून आपण शिवसैनिक असो तथा सेनेचे पदाधिकारी असो यामध्ये कधीही भेदभाव वागणूक वेगळी नाही. शिवसेनेची खासदार या नात्याने आपण मतदार संघात रेल्वे असो अथवा रस्ते तसेच अनेक विविध विकास कामे केली आहेत तर अनेक विकास कामे सुरु आहेत. प्रामाणिकपणे काम करणे व सर्वांना सोबत घेऊन चालणे यावर आपला भर असतो, असे म्हणत भाजपात जाण्याच्या वावड्या उठविणाºयांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत गवळी यांचे स्विय सहायक अजय गिलचे, जि.प.सभापती विश्वनाथ सानप, अनिल पाटील, उपाध्यक्ष माणिकराव देशमुख, सुरेश मापारी, गजानन भांदुर्गे, विष्णूपंत भुतेकर, अ‍ॅड.विनोद खंडेलवाल, विवेक नरवाडे, नीलेश पेंढारकर, प्रकाश अपूर्वा, बंडू शिंदे, सुनील सुर्वे, संतोष जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .