शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरचे वैद्यकीय अधिकारी निलंबित

By admin | Updated: March 1, 2016 01:13 IST

ढोरखेडाप्रकरणी आरोग्य संचालनालयाचे आदेश.

शिरपूर जैन : शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांना ढोरखेडाप्रकरणी निलंबित केले असून, आरोग्य संचालनालयाचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना प्राप्त झाले आहेत. सप्टेंबर २0१५ मध्ये मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे चक्रिवादळात अध्र्याअधिक घरांवरील टिन उडून गेले होते तर काही घरे जमीनदोस्त झाली होती. अनेकांना दुखापत झाल्याने शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. वैद्यकीय सेवा तातडीने घटनास्थळी पोचविण्यात शिरपूर आरोग्य केंद्राने दिरंगाई केल्याचे समोर आले होते. याबाबत ढोरखेडा येथील नागरिकांनी जिल्हा परिषद व आरोग्य विभागाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. ढोरखेडा गावात तातडीने आरोग्य सेवा पोचविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसा अहवालही आरोग्य विभाग व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आरोग्य संचालनालयाकडे पाठविला होता. चौकशीअंती दोषी आढळल्याने डॉ. महाजन यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना प्राप्त झाले. या वृत्ताला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दुजोरा दिला. दरम्यान, आरोग्य संचालनालयाच्या आदेशाने कामचुकार अधिकारी-कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. कर्तव्यात दिरंगाई करणार्‍यांची गय केली जाणार नाही, वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिला.