शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरचा पाणी पुरवठा पाच दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST

शिरपूर जैन येथे अडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अडोळ प्रकल्पाचे शिरपूर ग्रामपंचायतीकडे चार ते पाच ...

शिरपूर जैन येथे अडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अडोळ प्रकल्पाचे शिरपूर ग्रामपंचायतीकडे चार ते पाच लाख रुपये पाणी बिल थकीत झाले. पाटबंधारे विभागाने शिरपूर ग्रामपंचायतला पाणी बिल भरण्यासाठी वेळोवेळी सूचनाही दिल्या. तथापि, ग्रामपंचायतीने पाणी बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त असल्याने व कोरोना काळात ग्रामपंचायत कामकाज चालविण्यासाठी आवश्यक कर वसुली यंत्रणा करू शकली नाही. त्यामुळेही थकित पाणीबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही. परिणामी पाटबंधारे विभागाने महावितरण कार्यालयाला पत्र देऊन शिरपूर पाणी पुरवठा योजनेचा अडोळ प्रकल्‍पावरील वीज पुरवठा खंडित करण्यास भाग पाडले. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून शिरपूर येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

------------

प्रशासनाने दखल घेण्याची गरज

शिरपूर येथील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे; परंतु ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर नवी ग्रामपंचायत अद्याप गठित झाली नाही. त्यामुळे नवीन सरपंच पदारूढ होईपर्यंत ही समस्या दूर होणे शक्य नसल्याचे दिसते. दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून चार दिवसांपासून पाणीपट्टी व घरकर वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पाटबंधारे विभागाचे देयकही भरले, तरी महावितरणचे ४० लाख रुपयांचे थकित देयक भरण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभा आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.