शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासुन शिरपूर येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनामुळे मोठी पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे ...

२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनामुळे मोठी पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत ४.८९ मंजूर करून घेतले. मात्र या योजनेचे काम नियमानुसार करण्यात आले नाही. पाईपलाईन जमिनीमध्ये योग्य त्या खोलीवर टाकण्यात आली नाही. परिणामी पाईपलाईन वारंवार लिकेज होत आहे. बागवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह तक्रारीसुध्दा केल्या. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. यावर बागवान यांनी लोक न्यायालयात प्रकरण नेले. परंतु अपेक्षित न्याय मिळू शकला नाही. परिणामी शिरपूर ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार नादुरुस्त होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्ती करून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. ‌

शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन प्रकल्पानजीकच एका मोठ्या नाल्यात नादुरुस्त झाली आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोठे प्रयत्न करूनही पाईप लाईन दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. या विषयी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

- भागवत भुरकाडे़, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत शिरपूर

राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम हे नियमानुसार न झाल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन कुठे ना कुठे सतत नादुरुस्त होत आहे. यामुळे गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकत नाही. याला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी जबाबदार आहेत.

- ईमदाद बागवान, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिरपूर जैन.