शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी वाशिममधील शिरपूर ग्रामपंचायतीचा पुढाकार

By admin | Updated: June 29, 2017 14:18 IST

स्थानिक ग्रामपंचायतने गावात स्वच्छता निर्माण राहावी म्हणून गावक-यांना 150 कचराकुंडी वाटप करुन नव्या घंटागाडी सुरू केली.

ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम), दि. 29 - स्थानिक ग्रामपंचायतने गावात स्वच्छता निर्माण राहावी म्हणून गावक-यांना 150 कचराकुंडी वाटप करुन नव्या घंटागाडी सुरू केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिरपूर गाव दिवसेंदिवस मोठे होत असताना गावात  मात्र जिकडे तिकडे अस्वच्छता पसरल्याचे चित्र होते. ग्रामपंचायतने स्वच्छतेबाबत वेळोवेळी प्रयत्नही केले, परंतु ते पाहिजे तसे यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील घाण नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतने एक नवीन घंटागाडी विकत घेण्याचा निर्णय घेतला.  या घंटागाडीची सुरुवात करण्यात आली. 
 
यावेळी उपसरपंच असलम गवळी, मो.ईमदाद बागवान, बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे यांच्या हस्ते २९ जूनपासून गावात घंटागाडी सुरू करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतच्यावतीने बसस्थानक परिसरातील दुकानदारांनी दुकानातील केरकचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये म्हणून त्यांना व गावातील १५० दुकानदारांना नवीन कचरा कुंड्यांचे मोफत वाटप केले. 
 
लाईट मोठ्या प्रमाणात लावून गाव प्रकाशमय केले आहे. आता गाव स्वच्छतेसाठी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकणा-यावर ग्रामपंचायतने कारवाई करावी अशा सूचना दिल्या. 
या कार्यक्रमाला वसंता देशमुख, संतोष भालेराव, संजय भालेराव, संजय गौर, गजानन वानखेडे, विजय अंभोरे, गणेश अंभोरे, कैलास राऊत, रामा गडदे, बंशी इंगळे, कैलासआप्पा देवकर, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
मांगुळ झनकनंतर शिरपूरचा स्वच्छतेसाठी पुढाकार
गत तीन ते चार वर्षापूर्वी आमदार अमित झनक यांचे गाव असलेले मांगुळ झनक येथील सरपंचा माधवी दत्तराव झनक यांनी गावात घंटागाडी व प्रत्येक घरासमोर कचराकुंडीचा उपक्रम राबवण्यात आला होता. तो अविरत सुरु असल्याने गावात स्वच्छता नांदत आहे. त्या पाठोपाठ शिरपूर ग्रामपंचायतने घेतलला पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गाव स्वच्छ राहिल्यास रोगराई दूर राहते या गोष्टीला लक्षात घेवून हा उपक्रम शिरपूर ग्रामपंचायतने घेतला. याला नागरिकांनही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.