शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान 

By admin | Updated: April 29, 2017 14:52 IST

गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. 

कारंजा लाड: पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे.  वेगवेगळया समाजिक, राजकीय संघटना पुढे येऊन जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करीत आहे. गाव पाणी दार करण्यासाठी आपली मदत व्हावी या हेतूने ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश हवा, विस्तार अधिकारी रवीद्र दहापुते, विनोद श्रीराव, ग्रामसेवक विनोद मोरे, डि.जी.निघोट, रामेश्वर सफकाळ, गजभिये तसेच पाणी फांउडेशने प्रशिक्षक दिलीप देवतळे, सुरज देशमुख यांच्या सह जयपूर येथील सरपंच ग्रामपचायत सदस्य व गावकरी श्रमदान २९ एप्रिल रोजी श्रमदान करीत होते. यावेळी गावातील लहान लहान बालकांंनीही आपली चमू तयार करून वानरसेनेप्रमाणे एलबीएसच्या कामांसाठी श्रमदान करुन मोठा हातभार लावला.  बालगोपाल जलसंधारणाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे पाहून वडिलधारी मंडळी भारावली. बालगोपालांमुळे त्यांचाही उत्साह द्विगुणित झाला.  या सर्वाच्या मदतीने एकुण २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ या दोन तासच्या वेळात तिन एल.बी.एस. म्हणजेच दगडी बांध तयार करण्यात आले. या बांधामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन शेतामधील सुपिक माती वाहुन जाणार नाही. पाण्याची साठवण श्रमता वाढून पाणी जमिनित मुरणार आहे. हा दगडी बांध नाल्यावर पावसाळयात उपयुक्त ठरतो.