शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरचे शेतकरी सारडा यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

By admin | Updated: July 12, 2017 01:37 IST

प्रगतिशील शेतकरी सचिन दामोदर सारडा यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते मुंबईत ११ जुलै रोजी गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : हळद आणि केळीचे विक्रमी उत्पादन घेणारे येथील प्रगतिशील शेतकरी सचिन दामोदर सारडा यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते मुंबईत ११ जुलै रोजी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली.जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे शेतकरी सारडा यांच्याकडे १.६२ हेक्टर शेती आहे. त्यांनी ठिबक सिंचनचा वापर करीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केळी आणि हळद या पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. शेतात गांडुळ खत उत्पादक युनिटची उभारणी करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. नागपूर कृषी वसंत-२०१४ या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून सहभाग नोंदवून हळद या पिकाबाबत इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषी विज्ञान केंद्र, कुरडा येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, कृषी संशोधन केंद्र, वाशिम व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथ प्रशिक्षण व हॉर्टीकल्चर सेंटर, तळेगाव दाभाडे, पुणे येथे शेडनेट उभारणीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामस्वच्छता अभियानातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्लास्टिकमुक्त गावाकरिता प्रयत्न केले. सारडा यांच्या या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला होता. त्या पुरस्काराचे वितरण ११ जुलैला मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सारडा यांच्या आईला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साडी भेट देण्यात आली. कार्यक्रमास सदाभाऊ खोत, सुभाष देसाई, कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.