शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गामध्ये शरद पवारांनी घातले लक्ष!

By admin | Updated: June 11, 2017 02:10 IST

शेतकर्‍यांशी संवाद साधून जाणून घेणार अडचणी; जिल्हय़ातील ५४ गावातून जाणार महामार्ग.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांचा विरोध पाहता शेतकर्‍यांनी आंदोलनी छेडलीत; परंतु एकही मोठा नेता यात सहभागी झाला नाही; परंतु शेतकर्‍यांच्या अडीअडचणी, समस्या सुधारण्याबाबत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नागपूर-मुंबई मार्गावरील मोठी शहरे ग्रामीण भागाशी जोडण्याकरिता शासनाने ह्यनागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वेह्ण अर्थात समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला आहे. जिल्हय़ातील ९७ किलोमीटर क्षेत्रात ४ तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या या महामार्गासाठी मालेगाव २२, कारंजा लाड २१, मंगरूळपीर १0 आणि रिसोड तालुक्यात एका गावामधील एकूण १५00 हेक्टर जमीन संपादित करणे व याशिवाय कृषी समृद्धी केंद्रांसाठी प्रत्येकी ४00 हेक्टर याप्रमाणे १२00 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हय़ात समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमीटर असून, ९३ किलोमीटर अंतराचे ह्यड्रोनह्णद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दगड रोवणीचे (पिलर फिक्सिंग) ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, ३५ गावांमध्ये संपादित करावयाच्या जमिनीची संयुक्त मोजणी केली आहे. मोजणी करीत असताना गावांमधील काही शेतकर्‍यांनी नियोजित स्थळी हजेरी लावली; मात्र ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या १00 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकर्‍यांचा विरोध या समृध्दी महामार्गाला का आहे, शासनाच्यावतीने त्यांच्या प्रश्नांचे निरसन व्यवस्थित केल्या जात आहे नाही, यासह या महामार्गात निर्माण होणार्‍या अडचणी, समस्या, सुधारणेबाबत खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील संत तुकाराम सभागृहामध्ये (सिडको नाटयगृह) १२ जून रोजी दुपारी २ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये महामार्गातील अडचणी, कोण्या शेतकर्‍यांच्या काही सूचना यासह समृद्धी महामार्गाबाबत सर्व प्रश्नांबाबत चर्चा व संवाद साधल्या जाणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरासरण केल्या जाणर आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या शंकांचे निराकरण करण्याचे आवाहन अँड. नजिर काझी यांनी केले आहे.