शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

युवकांमध्ये गांधीजींचे विचार रुजविण्यासाठी ‘शांती’ यात्रा!

By admin | Updated: October 8, 2016 02:13 IST

गांधीवादी कार्यकर्त्याचा उपक्रम; रत्नागिरी ते सेवाग्राम शांती रथयात्रा.

वाशिम, दि. 0७ - महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल, तर त्यांचे विचार युवकांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत रत्नगिरी जिल्ह्याच्या मंडणगड येथील गांधीवादी कार्यकर्ते तथा लेखक बापू शेठ यांनी त्यांच्या पाच सहकार्‍यांच्या सहाय्याने ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्ण अशी शांती रथयात्राच काढली आहे. ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्णदरम्यान येणार्‍या शहरांतील महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन महात्मा गांधी यांचे विचार युवकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.महात्मा गांधी यांच्या आचार-विचारांचे व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच आकर्षण आहे. विशेष करून आजची तरुण पिढी, विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनाही गांधीजींचे विचार, त्यांची जीवननिष्ठा व त्यांचे जीवनदर्शनाबाबत कमालीचे आकर्षण आहे. हीच बाब लक्षात घेऊन रत्नागिरी येथील लेखक तथा गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ, तसेच त्यांचे सहकारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दीपक चंद्रकांत घोषाळकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव सुधाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शंकर घोषाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजाराम शंकर राऊत यांनी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत ते रत्नागिरी ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमापर्यंत शांती रथयात्रा काढून विविध ठिकाणच्या महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करून युवकांना गांधीजींची जीवनशैली, त्यांचे आचार- विचाराबाबत मार्गदर्शन करण्यासह जागतिक शांततेचे आवाहन करीत आहेत. ही रथयात्रा रत्नागिरी येथून निघाल्यानंतर मलकापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, राळेगण सिद्धी, औरंगाबाद, जालना अशी फिरून शुक्रवारी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. पुढे यवतमाळ मार्गे ही रथयात्रा वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दाखल होणार आहे.