शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात होणार सात-बाराचे चावडी वाचन!

By admin | Updated: May 7, 2017 02:07 IST

प्रशासनाची विशेष मोहीम : १ ऑगस्टपर्यंंत विविध उपक्रमांचे आयोजन

वाशिम : "ई महाभूमी" या प्रकल्पांतर्गत अचूक संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारासाठी जिल्हाभरात १ ऑगस्टपर्यंंंत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्र दिनापासून करण्यात आली. याअंतर्गत शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरीत तथा संगणकीकृत सात-बारा मिळवून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवार, ६ मे रोजी दिली.या उपक्रमांतर्गत १ ते १५ मे २0१७ या कालावधीत शेतकर्‍यांनी आपला संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारा अचूक असल्याची खात्री करण्यासाठी या संकेतस्थळास भेट द्यावी. यासंदर्भात काही आक्षेप असल्यास गावातील तलाठय़ांशी संपर्क साधून चुकीची दुरुस्ती करून घेण्याबाबत जनजागृती केली जात आहे. पुढच्या टप्प्यात १५ मे ते १५ जून २0१७ या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांमध्ये संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बाराचे चावडी वाचन होणार आहे. शेतकर्‍यांसंबंधीच्या या महत्त्वपूर्ण दस्तावेजात कुठल्याच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी या उपक्रमादरम्यान त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १६ जून ते ३१ जुलै २0१७ या कालावधीत सात-बारासंबंधी प्राप्त आक्षेपांचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष चमू कार्यरत राहील, असे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम जिल्हाभरात यशस्वीरीत्या राबविल्यानंतर १ ऑगस्टपासून शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारा उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. तथापि, प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.