स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. तथा मुख्य कार्यपालन अधिकारी वसुमना पंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावस्तरावर जिल्हा परिषद शाळा इमारतीत २८ मेपासून विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयींनी युक्त विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून पुरुष तथा महिला मंडळींसाठी निवासाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी गटविकास अधिकारी वाघमारे व मानोरा तहसीलदार शारदा जाधव यांनी तातडीने विलगीकरण कक्ष सुरू केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची प्रशंसा करीत, फारशी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाला या विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी मंडळ अधिकारी देविदास काटकर, पोलीस पाटील दुर्योधन काळेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य विनादेवी अजय जैस्वाल, सरपंच हिंमत राऊत, उपसरपंच शंकर नागोलकार, धनराज दिघडे, डिंगाबर इंगळे, ग्रामविस्तार अधिकारी शरद शिंदे, मनीषाताई दिघडे, माधुरी मनवर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आदींची उपस्थिती होती.